लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात झालेल्या कंटेनर व दुचकीत झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलींचा जागेवरच मृत्यू झला आहे. हा अपघात शनिवारी (ता. २०) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
छकुली कुमार शितोळे (वय -१७) राजश्री कुमार शितोळे (वय-१० दोघीही रा.कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छकुली ही इयत्ता अकरावीला लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तर राजश्री ही इयत्ता सहावीत शिकत होती. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळेत जात असताना लोणी स्टेशन चौकात एका कंटेनर ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघींचाही चेंदामेंदा झाला. व जागेवरच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात