पुणे : आजपासून ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर आज 1 ऑगस्टपासून तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. यावेळी देखील 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती बदलल्या आहेत, तर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती या वेळीही कायम आहेत.
गुरुवार 1 ऑगस्टपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 8.50 रुपयांनी महागला आहे. एकीकडे 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत आहेत, तर दुसरीकडे तेल विपणन कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या (एलपीजी सिलिंडरची किंमत) दीर्घकाळापासून कायम ठेवली आहेत.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीचा फटका मुंबईकरांना देखील बसला आहे. आज 1 ऑगस्टपासून मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडर 802.50 रुपयांना मिळणार आहे. तर 19 किलोच्या निळ्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1 हजार 605 रुपये झाली आहे. त्यात 7 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी हे दर 1 हजार 598 रुपये होते. चेन्नईतही एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता येथे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1 हजार 817 रुपयांना मिळणार आहे. पूर्वी हा दर 1 हजार 909.50 रुपये होता.