Wayanad Landslides : केरळच्या वायनाडमधील मेप्पाडीजवळ झालेल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत असून २०० नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. जखमी रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भूस्खलन घटनास्थळी पोहोचले आहेत. पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी तसेच मदत शिबिरे आणि वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे.
वायनाडमध्ये युद्धपातळीवर विविध संघटना आणि सशस्त्रदलांकडून शोध आणि बचावकार्य सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराने मुंडक्काई येथे ब्रिज बांधला आहे. वायनाडमध्ये 45 मदत शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये 3,000 हून अधिक विस्थापित लोकांना आश्रय देण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.