– बापू मुळीक
सासवड : पुरंदर तालुक्यातील मावडी सुपे गावच्या उपसरपंचपदी सविता विलास बहिरट यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदावर काम करणारे शामराव देवकर यांची ठरलेली मुदत संपल्याने रिक्त जागेवर सरपंच अनिल देवकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली.
या सभेत बहिरट यांचा एकमेव अर्ज आल्याने त्या उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आल्याचे सरपंच अनिल देवकर यांनी जाहीर केले. उपसरपंच सविता बहिरट या मावडी येथे उत्तम शेती करतात, याशिवाय महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी बचत गट चालवितात.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांच्या त्या पुतणी होत. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, माजी जि. प. सदस्य सुदाम अप्पा इंगळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेते प्रा. जितेंद्र देवकर, पिसर्वे गावचे सरपंच रवींद्र कोलते यांनी अभिनंदन केले.