लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी राजेंद्र हनुमंतू करणकोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची वाहतूक शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे. हे आदेश पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (ता.30) जारी केले.
राजेंद्र करणकोट यांनी जोडभावी पोलीस ठाणे (सोलापूर) व पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना, आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. राजेंद्र करणकोट हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. आपल्या ‘सिंघम’ स्टाईल कामांमुळे ते लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीलाही आता चाफ बसणार का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
दरम्यान. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशासकीय कारणास्तव 20 पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या स्वरुपात बदल्या केल्या आहेत. तसेच त्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन त्वरित पदभार स्वीकारावा, असे आदेशात म्हटले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे (कंसात कोठून कोठे बदली झालेली ठिकाणे)
1) शशिकांत चव्हाण (लोणी काळभोर पोलीस ठाणे ते पुणे शहर वाहतूक शाखा)
2) स्वप्नाली शिंदे (डेक्कन पोलीस ठाणे ते सायबर पोलीस ठाणे)
3) राजेंद्र जगन्नाथ मगर (लष्कर पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा)
4 ) दिपाली भुजबळ (विश्रामबाग पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा)
5) आनंदराव खोबरे (विमानतळ पोलिस ठाणे ते गुन्हे शाखा)
6) विश्वजीत काइंगडे (खडक पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष)
7) अजय कुलकर्णी (नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा)
8) शैलेश संखे (चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा)
9) संतोष सोनवणे (कोंढवा पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा)
वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात कोठून कोठे बदली झालेली ठिकाणे)
1)राजेंद्र करणकोट (गुन्हे, वानवडी पोलीस ठाणे ते लोणी काळभोर)
2)महेश बोळकोटगी (मुंढवा पोलीस ठाणे ते चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे)
3)विनय पाटणकर (बिबेवाडी पोलीस ठाणे ते कोंढवा पोलीस ठाणे)
4)गिरीश दिघावकर (खडकी पोलीस ठाणे ते लष्कर पोलीस ठाणे)
5)मंगल शामराव मोढवे (गुन्हे, हडपसर पोलीस ठाणे ते बिबेवाडी पोलीस ठाणे)
6)सतीश जगदाळे (गुन्हे, डेक्कन पोलीस ठाणे ते खडकी पोलीस ठाणे)
7)संतोष खेतमाळस (गुन्हे खडक पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस ठाणे)
8)विजयमाला पवार ( गुन्हे, चतुर्श्रुंगी पोलीस ठाणे ते विश्रामबाग पोलीस ठाणे)
9)नीलकंठ जगताप (गुन्हे,वारजे माळवाडी ते मुंढवा पोलीस ठाणे)
10)अजय संकेश्वरी (वाहतूक शाखा ते विमानतळ पोलिस ठाणे)
11) गिरीषा निंबाळकर (गुन्हे, शिवाजीनगर पोलीस ठाणे ते डेक्कन पोलीस ठाणे)