नवी दिल्ली : सध्या आपण ऑनलाईन व्यवहार अगदी क्षणात करतो. त्यासाठी मोबाईल नंबर किंवा क्यूआर कोडची गरज भासते. मात्र, ज्या लोकांकडे कार्ड आहे त्यांना हे व्यवहार करता येत नव्हते. हीच गरज लक्षात घेऊन Paytm कडून NFC Card SoundBox लाँच केला जाणार आहे. या साउंडबॉक्सच्या मदतीने कार्डच्या माध्यमातूनही पेमेंट करता येणार आहे.
भारतात पेमेंट प्रक्रिया अधिक सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने कंपनीकडून पावले उचलली जात आहे. त्यात NFC Card SoundBox लाँच केला जाणार आहे. या बॉक्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळू शकणार आहे. त्याचबरोबर QR द्वारे मोबाईल पेमेंटदेखील करता येणार आहे. या एनएफसी कार्ड साउंडबॉक्सद्वारे ग्राहकांना पेमेंट करण्यासाठी आणखीन एक पर्याय निर्माण होणार आहे.
हे एक Contactless डिवाईस असून, ग्राहकांना फक्त त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड टॅप करावे लागणार आहे. त्याचबरोबर UPI पेमेंट्स तसेच QR पेमेंट्ससारख्या पेमेंट सुविधा या यंत्राद्वारे मिळवता येणार आहे.