– संगीता कांबळे
पिंपरी : संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्षपदी डॉ.पं. नंदकिशोर कपोते यांची निवड करण्यात आली आहे.
संस्कार भारती, पश्चिम प्रांताची साधारण सभा सोलापूर येथे संपन्न झाली. यावेळी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आलेली आहे त्यात
अध्यक्ष – डॉ. पं. नंदकिशोर कपोते.
सचिव – लीना आढाव
सहसचिव – उत्तम साठे , आसावरी बर्वे
कोष प्रमुख – प्रचिती भिष्णूरकर
सह कोष प्रमुख – रूपकांत जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
ही कार्यकारीणी सन 2024 ते 2027 या तीन वर्षांसाठी असणार आहे. अखिल भारतीय संगठन मंत्री अभिजित गोखले, महामंत्री सतिश कुलकर्णी, महामंत्री प्रशांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व कलाकारांसाठी अनेक संस्कारक्षम सांस्कृतिक कार्यक्रम करेल व औद्योगिक नगरीत सांस्कृतिक वातावरण निर्मिती करेल, असे उद् गार डॉ.पं. नंदकिशोर कपोते यांनी काढले.