Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सवर्च पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतं दिसत आहे. अशातच आता ‘सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहे’ असं वक्तव्य करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. उरणमध्ये झालेल्या घटनेवर न बोलणाऱ्या ताईंना दादांवर बोलायला वेळ आहे, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना धारेवर धरलं आहे.
सुप्रिया सुळे यांना विधानसभेचे वेध लागल्याने त्या हास्यास्पद विधानं करत असल्याचे म्हणत रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चाकणकर म्हणाल्या कि, उरणच्या पिडीतेवर एकही चक्कार शब्द न बोललेल्या सुप्रिया सुळे दररोज दादांवर अनेक विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. लोकसभेत त्यांचा सेट केलेला नरेटिव्ह आता धूऊन निघाला आहे. त्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. इतकंच नाही तर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत, तसेच अशा पद्धतीचे विधानं करून माध्यमांसमोर जाण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असतो. असा घणाघात रूपाली चाकणकर यांनी केला आहे.