पुणे : बँक ऑफ बडोदा कॉर्पोरेट फायनान्शिअल सर्व्हिसेस पुणे शाखेकडून सिंहगड खोऱ्यातील 4 जिल्हा परिषद शाळेतील 60 मुलांना 60 हजार रुपये किमतीचे ट्रॅकसूट व मिठाई वाटप करण्यात आले आहे.
यामध्ये जिल्हा परिषदेच्या मोरदरी, दुधानवस्ती, अवसरी नगर, थोपटेवाडी घेरा या शाळेतील सर्व मुलांना ट्रॅक सूट व मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक नीरज नांगरानी, व्यवस्थापक संतोष कुमार शर्मा, योगेश कुलकर्णी, म्रिगांक श्रीवास्तव, बिझनेस असोसिएट स्नेहा प्रियानी, चींदा शेळकंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट आणि खाऊ(मिठाई) वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हनुमंत जाधव, प्रविण झांबरे, गणेश जाधव, अमोल मोरे, बापू तावरे, शोभा खाटपे, सतीश वानखेडे हे उपस्थित होते.