पुणे : लोकसेवा आयोग मुख्य परिक्षा २१, २२ आणि २३ नोव्हेंबर (November) रोजी घेतल्या जाणार आहे तरी मुख्य परिक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक पत्रक काढत लोकसेवा आयोगाकडून विशेष सुचना पत्र जारी करण्यात आलं आहे.
राज्य सरकारच्या सेवेतील विविध सेवांमधील भरतीकरीता लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परिक्षा (MPSC Pre Exam) घेण्यात आली होती. ही परिक्षा दिलेले विद्यार्थी मोठ्या कालावधीपासून निकालाच्या (Result) प्रतिक्षेत होते.
४ नोव्हेंबर रोजी लोकसेवा योगाकडून या परिक्षेचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर जे विद्यार्थी ही परिक्षा उत्तीर्ण झाले त्यांना पुठील परिक्षा म्हणजे राज्यसेवा मुख्य परिक्षा (MPSC Mains Exam) द्यावी लागणार आहे.
तरी या लोकसेवा आयोगाकडून या मुख्य परिक्षेची तारीख आणि परिक्षा केंद्र नुकतेचं जाहीर करण्यात आले आहे.
राज्यसेवा मुख्य परिक्षा राज्यात अमरावती (Amravati), नागपूर (Nagpur), नाशिक (Nashik), पुणे (Pune), मुंबई (Mumbai) आणि औरंगाबाद (Aurangabad) या शहरांमधील विविध परिक्षा स्थळांवर घेण्यात येणार आहे.
राज्यसेवा मुख्य परिक्षा 2022 मधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गात एकूण 623 जागा भरण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेतून (MPSC Pre Exam) मुख्य परीक्षेकरता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी आणि गुणांची कटऑफ आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे