भिगवण (पुणे) : आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो, या उदात्त व शुद्ध भावनेने समाजातील उपेक्षित घटकांना यथाशक्ती मदत करण्याचे शिव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर यांनी ठरवले. जिल्हा परिषद पुणे यांच्या एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत भिगवण स्टेशन येथे विद्यार्थ्यांना 200 वॉटर बॅग व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना बंडगर म्हणाले कि, शिव फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. भिगवण स्टेशन येथील शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची बॉटलची गरज होती, ही गरज लक्षात घेऊन 200 बॉटल उपलब्ध करून दिल्या आणि भविष्यात देखील आपण शाळेसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी देऊ असे आश्वासन देखील दिले.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी भिगवण ग्रामपंचायत सदस्य कपिल भाकरे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संजय खाडे, दिनेश मारणे, किरण रायसोनी, अरविंद देवकाते, संतोष आब्बड, आकाश वणवे तसेच शाळा व्यवस्थापन समिती भिगवण स्टेशनचे अध्यक्ष दीपक गुणवरे, सदस्य महेंद्र मदने, पुनम शेळके, हसीना बारसकर, कोमल मराळे आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षिका लोखंडे, वणवे, शवीरकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक भारत गायकवाड यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ वणवे यांनी केले व आभार राहुल लंबाते यांनी मानले.