पुणे : माजी आमदार, शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.
पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच त्यांचं शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचं वृत्त सामनातून देण्यात आलं आहे.
विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार आहे. ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचं प्रतिनिधीत्व करतात. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई कऱण्यात आली आहे. पक्षबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांना पाठींबा देणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे.