पुरंदर : पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पाहटेच्या दरम्यान चोरट्यांनी चार घरफोड्या करून काही साहित्य, मौल्यवान वस्तु व मोटारसाइकल लंपास केले आहे. तसेच दोन महिन्यापूर्वी याचं गावात अशाच प्रकारची मोठ्या स्वरूपाची चोरीची घटना घडली होती. त्याचा अजुनही तपास न लागल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
असंतोष मुळे ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांना धीर देताना व या गंभीर घटनेचा तातडीने तपास करूण गुन्हेगारांना त्वरित पकडून चोरीस गेलेला सर्व ऐवज संबधिताना परत मिळावा याबाबत माजी आमदार अशोकभाऊ टेकवाडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी भाजपा नेते गंगारामदादा जगदाळे, जालींदर जगताप, रोहिदास कड, महादेव शेडंकर, बाळासाहेब काळाने, दत्ता कड, स्थानिक राजेंन्द्र भोसले, सागर भोसले, कैलाश भोसले सर, संतोष भोंसले, पोलीस पाटील ऊपस्थित होते.