पुणे : जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया दोन दिवसांत सुरू होणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला जालना येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 44 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, यासाठी 9 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://jalna.gov.in/en/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक.
– एकूण रिक्त पदे : 44 पदे.
– नोकरीचे ठिकाण : जालना.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 29 जुलै 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, बायपास रोड, समर्थनगर जालना, पिन – ४३१२१३.