मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या शासकीय निवासस्थानी एका खास माणसालां पाठवले होते. त्या माणसाकडे मला तीन वर्षांपूर्वी एक ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
ते म्हणाले, मला उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असा आरोप करण्यास सांगण्यात आलं होतं. मी तो आरोप केला नाही. तसेच आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानवर बलात्कार करून बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप सुद्धा करण्यास सांगितलं होतं, पण मी ते आरोप केले नाहीत, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
ऑफर संदर्भातले भक्कम पुरावे माझ्याकडे
या ऑफर संदर्भातले भक्कम पुरावे माझ्याकडे असून मी योग्य वेळी ते समोर आणणार असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी केलेले आरोपांमध्ये तथ्य असल्याचेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
अजित पवारांवरही आरोप करण्यास सांगितले
पुढे बोलताना म्हणाले की, मला अनिल परब यांच्या विरोधातही आरोप करण्यास सांगितले होते. तसेच अजित पवारांबद्दल गुटखा व्यावसायिकांच्या संदर्भात देखील आरोप करण्यास सांगण्यात आले होते. मी हे काहीही केलं नाही म्हणूनच मला 13 महिने तुरुंगात राहावं लागलं असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केला.