– संतोष पारधी
वाकी बुद्रुक(ता.खेड) : जिल्हा परिषद प्राथ. शाळा वडगाव खेड येथील शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापन जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव, संस्थापक अध्यक्ष योद्धा माजी सैनिक संघटन आणि त्यांचे सहकारी माजी सैनिक ऋषिकेश आरुडे यांनी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना आपत्तीच्या वेळी येणाऱ्या संकटाना कसे सामोरे गेले पाहिजे, या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये माजी सैनिक संतोष ढवळे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, कुमार गायकवाड, सदस्य ग्रामपंचायत तसेच शिक्षक वृंद सहभागी झाले.
वडगाव पाटोळे येथील जिल्हा परिषद शाळेत घेतलेल्या आपत्ती व्यवस्थापन आणि जागरूकता कार्यक्रमांमध्ये माजी सैनिक साहेबराव जाधव यांनी विद्यार्थी व शिक्षकांना पूरग्रस्त परिस्थिती असेल. तसेच भूकंप परिस्थितीच्या वेळी काय सावधानता बाळगावी, याविषयी माहिती दिली. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून इमर्जन्सी मध्ये मदत कशी घ्यावी, सीपीआर कसा द्यावा, तसेच फायर फायटिंगचे देखील प्रशिक्षण देण्यात आले. विविध शाळा आणि संस्थांमध्ये फायर फायटिंग चे इक्विपमेंट अग्निशामक यंत्र बसवलेले असतात. परंतु अनेकांना हे यंत्र कसे हाताळावे, याची माहिती नसते. म्हणून अग्निशामक यंत्रांचा वापर कसा करावा, याचे देखील प्रशिक्षण देण्यात आले.
20 वर्षे किंवा त्याहूनही जास्त सीमेवर सेवा केल्यानंतरही जीवन असेपर्यंत देशसेवा करण्याची हिम्मत ही सैनिकात असते, याचे उत्तम उदाहरण या कार्यक्रमातून पहावयास मिळाले.