अरुण भोई
राजेगाव : कृषी विभागाच्या वस्ती शाळेतील महिलावर्ग तसेच शेतकरी पुरुष गटाला शेती व्यवस्थापनातील मका-बाजरी या पिकांसाठी त्यांच्या पोषक वाढीसाठी औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात अनेक छोटे मोठे बचत गट कार्यरत आहेत. ग्रामीण आणि महिला उद्योजकता विकसित करण्यात बचत गटाचा मोठा वाटा आहे.
बचत गट चळवळीने महिलांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग मिळवून दिला आहे. प्रारंभी स्वतःच्या बचतीला प्राधान्य देत त्यांनी स्वतःची पत निर्माण केली. सामूहिक उद्योगातून उत्पादन सुरू केले. त्यातून उद्योजकतेचा विश्वास मिळताच अनेक महिलांनी बचत गटांतून कर्ज घेऊन स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय आणि आपले अस्तित्व निर्माण केले आहे.
पहिल्यांदा बचत गटाची सुरुवात करायची असेल तर तो गट कसा तयार करायचा, त्याची सुरुवात कशी करायची, गटाची रचना कशी आहे, त्यातून कोणते व्यवसाय करता येतील, त्यातून फायदे कसे मिळतील? याबद्दल सविस्तर माहिती राजेगाव येथील माऊली मंदिर या ठिकाणी कृषी विभाग महाराष्ट्र शासन उपविभाग दौंड यांच्या वतीने देण्यात आली.
तसेच सोबत कृषी विभागाच्या वस्ती शाळेतील महिलावर्ग तसेच शेतकरी पुरुष गटाला शेती व्यवस्थापनातील मका-बाजरी या पिकांसाठी त्यांच्या पोषक वाढीसाठी औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्यावतीने कृषी सहाय्यक तपकिरे, यांनी उपस्थित शेतकरी महिला व पुरुष यांना पिकांमध्ये कीटकांसाठी सापळा लावणे त्याचप्रमाणे दिलेली औषधे वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव तसेच पुरुष बचत गट, महिला बचत गट, उपस्थित होते.