- अरुण भोई
दौंड : दौंड तालुक्यातील मौजे देऊळगाव राजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथील सचिव सुनिल जाधव यांनी अंगणवाडी सेविका सुनिता नागवे यांना आठ हजार रुपये लाच मागितली. या प्रकरणी सुनिता नागवे यांनी पोलिसात तक्रार करताच सुनिल जाधव यांच्यावर दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुनिता नागवे यांनी दिलेल्या माहितीवरून, दौंड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 531/2024 भा.न्या.स कायदा कलम-118 (1), 352, 351(2) गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.
या बाबत अधिक माहिती अशी की. (दि. 18 जुलै) रोजी फिर्यादी सुनिता नागवे (वय 49) (रा. वडगाव दरेकर ता. दौड जि. पुणे) नेहमी प्रमाणे वडगाव दरेकर अंगणवाडी केंद्र येथून दुपारी एक च्या सुमारास घरी आल्या. व मुलाच्या कर्जाचे कागदपत्रे देण्यासाठी देऊळगाव राजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे दुपारी दोन वाजता सुनिता या तिथे गेल्या. त्यावेळी सोसायटी मधील सचिव सुनिल जाधव (रा. हिंगणीबेर्डी ता. दौड जि. पुणे) यांना मुलाचे कर्जाचे कागदपत्रे देण्यासाठी भेटले तेव्हा फिर्यादीला ते म्हणाले की, तुम्ही तलाठ्याचा दाखला आणा. मग तुमचे कर्जाचे पैसे वाटप करेल.
त्यावेळी फिर्यादी लगेच दाखला आणते, मला आजच्या आज कर्जाचे पैसे दया, असे म्हणाले. त्यावेळी सचिव सुनिल जाधव हे फिर्यादीला म्हणाले की, तुमच्या कर्जाचे वाटप आज करतो. मला आठ हजार रुपये दया. त्यावर फिर्यादी म्हणाल्या की, माझ्या मुलाने गाडी घेतली आहे. मी पैसे देणार नाही. फिर्यादी असा का म्हणाल्या.? याचा राग मनात धरून सचिव सुनिल जाधव यांनी माझ्या सोबत हुज्जत घालून मला काठीने मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच दमदाटीही करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, फिर्यादी तेथून निघून दौंड पोलीस स्टेशन येथे आली. पोलीसांनी औषधोपचारासाठी मेडिकल यादी दिली. औषधोपचार करून सदर घटने बाबत दौंड पोलीस स्टेशन येथे सचिव सुनिल जाधव यांच्या विरूद्ध कायदेशीर तक्रार दिल्याचे नमूद करण्यात आले. दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सपोनि गटकुळ आणि पो. हवा. लोहार करीत आहेत