नवी दिल्ली : सध्या WhatsApp चा वापर वाढताना दिसत आहे. त्यानुसार, कंपनीकडून अनेक फिचर्स आणले जातात. असे असताना आता तुम्हाला WhatsApp वरूनही Heavy Files शेअर करता येऊ शकणार आहेत. त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही अॅपची गरज लागणार नाही.
मेटा-मालकीचे इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग ॲप WhatsApp एका फिचरवर काम करत आहे, ज्यामुळे दोन फोनमधील फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची गरज भासणार नाही. तुम्ही तुमच्या WhatsApp द्वारे थेट सर्वात मोठ्या फाईल्स देखील ट्रान्सफर करू शकणार आहात.
WhatsApp च्या आगामी फीचर्सची माहिती देणाऱ्या WABetaInfo ने व्हॉट्सॲपच्या या आगामी फीचरची माहिती दिली आहे. हे Apple च्या AirDrop आणि Google च्या Nearby Share प्रमाणेच काम करेल. हे फीचर आल्यानंतर व्हिडिओ, फोटो आणि इतर फाईल्स एका डिव्हाईसवरून दुसऱ्या डिव्हाईसवर शेअर करता येतील.