लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रत्नाबाई राजाराम वाळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रियांका सचिन काळभोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हि निवडणूक घेण्यात आली.
लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. 23) ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी रत्नाबाई राजाराम वाळके यांचा एकमेव अर्ज आल्याने लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे यांनी रत्नाबाई वाळके यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास आधिकारी सतीश गवारे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधव काळभोर, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, शिवदास काळभोर, माजी उपसभापती सनी काळभोर, साधना बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाष आप्पा काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, योगेश काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, ललिता काळभोर, सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, पत्रकार सीताराम लांडगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, अमित काळभोर, युवराज काळभोर, राजेंद्र काळभोर, आदी ग्रामपंचायत कर्मचारी वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, गावच्या सर्वांगिण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण प्रयत्न करु. तसेच गावची विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नवनिर्वाचित उपसरपंच रत्नाबाई वाळके यांनी केले.