पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात मेडिकल कोऑर्डिनेटर, अकाऊंटंट कम बिलिंग क्लर्क, डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 19 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2024 ही असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला रत्नागिरी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यात 21-38 ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
या प्रक्रियेंतर्गत एकूण 3 पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अधिक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ratnagiri.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.