मुंबई : ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ने शुक्रवारी जून 2024 ला संपलेल्या पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 5 टक्के घट नोंदवली. कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 15,138 कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो 16,011 कोटी रुपयांवर होता.
‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’ने शुक्रवारी 30 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत 5,445 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीने नोंदवलेल्या 4,863 कोटी रुपयांपेक्षा ही रक्कम 12% जास्त आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दूरसंचार उपकंपनीने 26,478 कोटी रुपयांचा महसूल जमा केला. कंपनीचा महसूल मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत कंपनीने नोंदवलेल्या 24,042 कोटी रुपयांपेक्षा 10% जास्त आहे.
दरम्यान, करानंतरचा नफा Q4FY24 मध्ये नोंदवलेल्या 5,337 कोटींपेक्षा 2% जास्त होता. कंपनीचा स्वतंत्र महसूल जानेवारी-मार्च या तिमाहीत 25,959 कोटींवरून दोन टक्क्यांनी वाढला असल्याचे सांगण्यात आले आहे.