पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. याच दिवसांत अनेक आजारांना कळत नकळत आमंत्रण मिळतं. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. त्यातच तुमच्यापैकी अनेकांना AC लावण्याची सवय असेल. यातील काहीजण तर हिवाळा असो वा पावसाळा एसी लावताना दिसतात. तुम्ही देखील पावसाळ्यात एसी लावत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरचेचे आहे.
तुम्ही पावसाळ्यात एसी लावत असाल तर तुमच्यासाठी कूल मोडऐवजी ड्राय मोड वापरणे अधिक फायदेशीर आहे. जर पाऊस कमी असेल आणि हवेत जास्त आर्द्रता नसेल तर तुम्ही कूल मोड वापरू शकता. ड्राय मोड हे हवेतील अतिरिक्त आर्द्रता कमी करून खोलीचे तापमान राखते. हे केवळ खोलीत थंडपणा आणत नाही. तर आर्द्रतादेखील काढून टाकते. त्यात कूल मोड देखील परिणामकारक ठरू शकतो.
AC वापरताना खोलीत हवा खेळती राहिलं याची काळजी घेतली जाते. थोडा वेळ खिडक्या उघडून ताजी हवा येऊ द्या. या हंगामात हवेतील आर्द्रतेची पातळी खूप जास्त असते. त्यामुळे घराच्या आतही आर्द्रता राहते. पावसाळ्यात एसीचे तापमान खूप कमी ठेवू नका. बाहेरची हवा थंड असल्याने खूप थंड असलेली खोली तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकते. एसी वापरताना त्याचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस इतके असावे.