नवी दिल्ली : सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहिला मिळत आहे. नवी देशांतर्गत मागणी आणि रुपयाच्या विनिमय दरातील घसरणीमुळे गुरुवारी सराफा बाजारात सोने 700 रुपयांनी वाढून 76,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सलग सहाव्या सत्रात सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. तर चांदीच्या दरात घसरण पाहिला मिळाली. चांदीचे दर 400 रुपयांनी घसरून 94,000 रुपये प्रति किलो झाला.
राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढून 76,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 750 रुपयांनी वाढून 76,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा भाव 400 रुपयांनी घसरून 94,000 रुपये प्रति किलो झाला, जो दराच्या तुलनेत कमी आहे. स्थानिक ज्वेलर्सच्या सततच्या खरेदीमुळे सोन्याचे भाव वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर
याशिवाय, रुपया सहा पैशांनी घसरून 83.64 रुपये प्रति डॉलर या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. परदेशी बाजारात कॉमेक्सवर सोन्याची किंमत प्रति औंस $ 6.90 ने वाढून $ 2,466.80 प्रति औंस झाली.
पुण्यात काय आहेत सोने-चांदीचे दर?
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 73,880 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत थोड्याशा फरकाने जास्त होताना दिसत आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 68,380 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 92,810 रुपयांवर गेले आहेत.