सासवड : टेकवडी (तालुका पुरंदर) येथे गडवाट संस्था व शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्ट गुरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने टेकवडी येथील किल्ले ढवळगड येथे वृक्षारोपण करण्यात आले.
सध्या वातावरणातील प्रदूषणाच्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. याच कारणाने ऑक्सिजची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन गडवाट संस्थेचे सदस्य मोनाली देसाई यांनी केली.
यावेळी टेकवडी गावचे माजी उपसरपंच सुरज गदादे, गडवाट संस्थेचे किशोर गरुड, संजू खताळ, राजश्री गरुड, राहुल बारवकर, राहुल जवळकर, शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्टचे निखिल खेडेकर, सचिन खेडेकर, तुषार महाडिक, रोहन महाडिक व टेकवडी गावातील शंभूराजे प्रतिष्ठानचे घनश्याम दरेकर, रोहन दरेकर, सौरभ दरेकर ,ओंकार जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते.