मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने आजवर तिच्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. हिना नेहमीच सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट शेअर करीत असते. हिनाने काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून तिसऱ्या टप्प्यात आहे. यानंतर आरोग्याबद्दल अपडेट देत सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसते.
हिना खानने इंस्टावर फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये हिना खान ही हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेली दिसत आहे. या फोटोमध्ये फक्त हिना खान हिचा हात दिसत आहे. आता ब्रेस्ट कॅन्सरनंतर हिना खान हिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिच्यावर कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यावेळी फोटो शेअर करत हिना खान हिने लिहिले की, मी सतत खूप जास्त त्रासामध्ये आहे. प्रत्येक मिनिटाला मला त्रास होत आहे. शरीरातील काही भाग खूप जास्त दुखत आहे.
हिनासाठी हॉस्पिटलच्या हाऊसकीपिंगकडून छान नोट देण्यात आली आहे. याचाही एक फोटो हिना खान हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या नोटवर लिहिण्यात आले की, हिना खान आम्हाला माहिती आहे की, ही सर्जरी तुमच्यासाठी नक्कीच सोपी नव्हती. परंतु, आम्हाला आशा आहे की, तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल.