इंदापूर : सांगली जिल्ह्यातील वाळवा या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे जेष्ठ नेते तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी विजयाचा दिवा लावला. अशी थेट तुलना भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी करून एका नव्या वादाला तोंड फोडले होते. या वक्तव्याबद्दल खुलासा करताना पाटील यांनी माझ्या वाक्यासंदर्भात कोणीही वेगळा अर्थ घेऊ नये, म्हणत सारवासारव केली आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, वाळवा येथील कार्यक्रमातील माझं पूर्ण स्टेटमेट ऐकलं पाहिजे, ते स्टेटमेंट इचलकरंजी लोकसभा निवडणुकीत खा. धैर्यशील माने यांच्या निवडणुकी संदर्भात होतं, त्याला इतर कोणताही संदर्भ नाही. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ हा निवडणुकीत अडचणीत असतानाही महायुतीचे उमेदवार खा.धैर्यशील माने यांनी विजय मिळवला, या संदर्भात त्यांचे कौतुक करताना मी बोलत होतो. इचलकरंजी शहरासंबंधी नव्हे तर इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून खा. धैर्यशील माने यांच्या विजयासंदर्भात मी भाषणात बोललो, असे पाटील म्हणाले.
राज्यात सुसंस्कृत राजकारणाची परंपरा मी 30 वर्षे जपली आहे. हे राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना माहित आहे. तरी माझ्या वाक्या संदर्भात कोणीही वेगळा अर्थ घेऊ नये, ही विनंती ही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.