मुंबई : महाराष्ट्रात सध्या ‘माझी लाडकी बहीण योजना’ सद्या चर्चेत आहे. माझी लाडकी बहीण योजनेची सर्वीकडे नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. आता या बाबत एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर गर्दी होत असल्याचे चित्र आहे. पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. पण आता ‘माझी लाडकी बहीण योजने’बाबत चिंता वाढवणारी एक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनाचा या योजनेला मात्र फटका बसू शकतो.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे.
मुंबईच्या बांद्रा कलेक्टर ऑफिसबाहेर आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा खुर्च्या खाली करा, असा शासकीय कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे.
काय परिणाम होणार?
या संपामुळे ‘माझी लाडकी बहीण योजने’च्या नोंदणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच पीक विमा योजनांच्या प्रक्रियेच्या कामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दैनंदिन काम न करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकही त्रस्त, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ड्युटीवर रुजू होणार नाही. असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. महसूल विभागात नवीन रोजगार पद्धत लागू करताना राज्य सरकारने कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकू नये. राज्य सरकारच्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून न टाकता नवीन रोजगार पॅटर्न लागू करावा यामागणीसाठी महसूल कर्मचारी आक्रमक झालेले दिओसून येत आहेत.