छत्रपती संभाजीनगर: लग्न झालेले असतानाही ते लपवित सहकारी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आणि दारू पाजून अत्याचार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तरुणीच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. वरुण बाळासाहेब गवळी (रा.छत्रपती संभाजीनगर) असे या आरोपीचे नाव आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीत महटले आहे की, आरोपी आणि ती दोघेही एकाच ठिकाणी जॉब करतात.
डॉ. गवळी याने अगोदरचे लग्न झालेले असताना ते लपविले आणि लग्नाचे आमिष दाखविले. एके दिवशी हॉटेलमध्ये दारू पाजून दारूच्या नशेत असताना इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच संमती नसताना इच्छेविरुद्ध अश्लील फोटो काढले. पीडितेच्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपोनि गायकवाड हे करीत आहेत. करतात.