शिक्रापूर : विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका महिलेचा दारूच्या नशेत विनयभंग करून महिलेच्या पतीला मारहाण केली. याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी विलास गायकवाड व बंटी (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विठ्ठलवाडी येथील एका महिलेचा पती बाहेर गेलेला असताना विलास गायकवाड हा एका युवकासह महिलेच्या घरी गेला. त्याने महिलेच्या पतीबाबत विचारपूस करत महिलेचा हात पकडून महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा विलास घरी आल्यानंतर त्याने महिलेच्या पतीला बाहेर बोलावून घेत लोखंडी गजाने मारहाण करत जखमी केले. पुढील तपास पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहेत.