पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून पुण्याच्या योगेश टिळेकर आणि पिंपरी- चिंचवडच्या अमित गोरखे यांनी विजय मिळवला. त्यामुळे पुण्यात महायुतीची आणि भाजपचीदेखील ताकद वाढली आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने पुण्यातील माजी आमदार योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली होती. संख्याबळाच्या आधारे टिळेकर यांचा विजय निश्चित मानला जात होता. टिळेकर यांनी पहिल्या संतीक्रमाची मते घेत दमदार विजय संपादन केला.
पिंपरीतील भाजपचे तरुण कार्यकर्ते आणि उच्चशिक्षित असणारे अमित गोरखेंना यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली. गोरखे यांनीही पहिल्या पसंतीची मते घेत विजय मिळवला. त्यामुळे भाजपच्या आमदारसंख्येत दोनने वाढ झाली. दोन आमदारांमुळे महायुतीची ताकददेखील वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे.