मुंबई : अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची चर्चा सर्व दूर सुरु आह. शाही लग्नाचा थाट काही वेगळाच आहे. आता या लाग्नाविषयी अजून एक माहिती समोर आली आहे. अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची सजावट ‘ॲन ओड टू वाराणसी’ या थीमवर आधारित आहे. वाराणसी या प्राचीन शहराची परंपरा, धार्मिकता, संस्कृती, कला, हस्तकला आणि बनारसी खाद्यपदार्थ यांचे दर्शन लग्नात होत आहे. बनारसी चाट, परफ्यूम – बांगड्यांचे दुकान, कठपुतळी शोसह पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची देशभरात चर्चा होत आहे. कोणत्याही राजाच्या शाही विवाहासारखाच हा विवाह सोहळा मुंबईच्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होत आहे. या लग्नात आधुनिकतेची झलक दिसत आहे. मात्र, जुन्या परंपरांही जपल्या जात आहेत. त्यामुळेच अनंत आणि राधिका यांच्या लग्नात पाहुण्यांना मुंबईतूनच बनारसचा घाट दिसणार आहे.
अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची सजावट ‘ॲन ओड टू वाराणसी’ या थीमवर आधारित आहे. वाराणसी या प्राचीन शहराची परंपरा, धार्मिकता, संस्कृती, कला, हस्तकला आणि बनारसी खाद्यपदार्थ यांचे दर्शन लग्नात होत आहे. बनारसी चाट, परफ्यूम – बांगड्यांचे दुकान, कठपुतळी शोसह पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलाच्या लग्नठिकाणी पोहोचल्यावर पाहुण्यांना बनारसची परंपरा आणि अध्यात्माशी जोडण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय त्या शहरातील खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. समारंभात अनेक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. प्रत्येक पाहुण्यांच्या भोजनाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. लग्नाला येणारे पाहुणे या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतील. शिवाय जाताना बनारसच्या घाटांच्या आठवणीही सोबत घेऊन जाणार आहेत.