पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात गृहस्थ (औषध) आणि रजिस्ट्रार (बालरोग) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 14 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : गृहस्थ (औषध) आणि रजिस्ट्रार (बालरोग).
– एकूण रिक्त पदे : 14 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस., एमडी. बालरोग / D.C.H. / सीपीएस (बालरोग).
– वेतन / मानधन : स्टायपेंड रु. 27,000/-
– वयोमर्यादा : 33 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-11.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://portal.mcgm.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.