पुणे : पुणे शहरातील सराईत गुन्हेगार व त्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी मोहीम चालू केली आहे. त्यातच आता वानवडी पुणे येथे रेकॉर्डवरील तडीपार व सराईत गुन्हेगारांकडुन एक देशी बनावटीचे पिस्टल व १ काडतुस जप्त करण्यात आले आहे. वानवडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथे पंडीत गॅरेजजवळ, शांतीनगरमध्ये एकाला पिस्टल व कोयता दाखवून धमकावले प्रकरणी वानवडी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहीता कलम ३५१ (३), ३५२, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), ४ (२५), व मुंबई पोलीस कायदा कलम-३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्हयातील आरोपी आकाश गोरख कांबळे, (रा. कोहीनूर हॉटेल जवळ, कॅम्प, पुणे), मयुर दिगंबर वाघमारे, (रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे), शिवम परशुराम जगताप ( रा. एसआरपीएफ क्वार्टर्स, वानवडी, पुणे) हे गुन्हा करुन फरार झाले होते.
त्याअनुशंगाने वानवडी पोलीस ठाणे येथील पोलीस उप-निरिक्षक संजय आदलिंग व पोलीस अंमलदार महेश गाढवे, सर्फराज देशमुख, संदीप साळवे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, यतीन भोसले, सोमनाथ कांबळे, गोपाल मदने, दाऊद सय्यद, अमोल पिलाणे यांनी नमुद फरार आरोपीबाबत अत्यंत चिकाटीने माहीती काढून, आरोपींचे ठावठिकाण्याबाबत माहीती मिळवली. त्याप्रमाणे नमुद आरोपी हे महेदवीनगर सहकारी गृहरचना सोसायटीचे अंतर्गत डिजने पार्क सोसायटीमधील मोकळ्या मैदानातील कंटेनरच्या मध्ये लपुन बसलेले असताना, त्यांना दिनांक ७ जुलै रोजी ताब्यात घेतले.
तसेच त्यांना वानवडी पोलीस ठाणे येथे आणुन त्यांची सखोल चौकशी करून त्यांनी फिर्यादी यांना दाखविलेले ३० हजार रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व ५०० रुपये किंमतीचा एक जिवंत राऊंड आणि ३०० रुपये किंमतीचा एक लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच यातील आरोपी नामे आकाश कांबळे(रा. कोहीनूर हॉटेल जवळ, कॅम्प, पुणे) हा पुणे शहरातून तडीपार असल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई ही श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री आर राजा, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त सो, वानवडी विभाग, पुणे शहर व श्री संजय पतंगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, संजय आदलिंग, व पोलीस अंमलदार अतुल गायकवाड, महेश गाढवे, सर्फराज देशमुख, दाऊद सय्यद, संदीप साळवे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, यतीन भोसले, सोमनाथ कांबळे, गोपाल मदने, अमोल पिलाणे या विशेष पथकाने केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास हे पोलीस उपनिरिक्षक संजय आदलिंग हे स्वतः करीत आहेत.