दौंड : शेतातील डीपीमधून 20 हजार रुपये किमतीची 40 किलो वजनाची काँपर वायर चोरून नेल्याची घटना दौंडमधील मेरगळवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय विद्युत अधिनियम कलम 136 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमाने 4 जुलै रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मेरगळवाडी (ता. दौंड, जि. पुणे) गावाच्या हद्दीमधील शेतात असणाऱ्या डीपीमधील 20 हजार रुपये किमतीची 40 किलो वजनाची काँपर वायर चोरून नेली आहे. तसेच डीपीमधील ऑईलचे नुकसान देखील केले आहे. या प्रकरणी कांतीलाल सोपान मेरगळ (वय-41 वर्षे, व्यवसाय-तंत्रज्ञ, रा. कौठडी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय विद्युत अधिनियम कलम 136 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नामदार अमिर शेख करीत आहेत.