Horoscope Today 11 July 2024 : आजचे राशीभविष्य तुम्हाला तुमची नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांबद्दल अंदाज देते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करण्यात यशस्वी व्हाल. दैनंदिन कुंडलीप्रमाणे ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींच्या आधारे तुमचे तारे आज तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे सांगेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? वाचा संपूर्ण १२ राशींचे भविष्य…
मेष : सध्या आपला असणारा बौद्धिक व वैचारिक संभ्रम कमी होणार आहे. मुला-मुलींची अपेक्षित प्रगती होईल. आर्थिक लाभ होणार आहेत. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आपल्याला सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : सौख्य व समाधान लाभणार आहे. तुमच्या कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. नोकरी व व्यवसायात तुम्हाला स्वास्थ्य लाभणार आहे.
मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना नवी दिशा सापडेल. तुम्ही आपल्या मतांवर ठाम असणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना भाग्यकारक अनुभव येतील. प्रवास सुखकर होतील.
कर्क : आर्थिक कामात सुयश लाभेल. कौटुंबिक मतभेद कमी होतील, स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचे आजच्या कामाचे नियोजन योग्य ठरणार आहे, काहींना अचानक धनलाभ होईल.
सिंह : तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या महत्त्वाच्या कामांचे नियोजन अचूक ठरेल, वैवाहिक सौख्य लाभेल.
कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. आध्यात्मिक प्रगती होईल. मानसिक अस्वस्थतेमुळे दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी.
तुळ: अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे महत्त्वाचे निर्णय आज योग्य ठरणार आहेत. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल.
वृश्चिक : दैनंदिन कामे यशस्वी होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. सार्वजनिक कामात सुयश लाभणार आहे. मान-सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या आजच्या कामांचे नियोजन अचूक ठरेल.
धनु : कामाचा ताण कमी होईल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मान-सन्मानाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवासातून आनंद मिळेल. मानसिक ताकद उत्तम राहील.
मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. दैनंदिन कामात लक्ष लागणार नाही. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. काहींना अनावश्यक खर्च करावा लागेल. मेहनत वाया जाईल.
कुंभ : दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुयश लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे.
मीन : मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. प्रवास शक्यतो आज नको. आज तुम्ही आपल्या महत्त्वाच्या कामात बारकाईने लक्ष घालावे. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे.