नवी दिल्ली : सध्या अनेक नवनवीन गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध कंपनी Samsung ने दोन लेटेस्ट असे इअरबड्स लाँच केले केले आहेत. Galaxy Buds 3 आणि Galaxy Buds 3 Pro असे हे इअरबड्स आहेत. या अनेक बेस्ट असे फिचर्स असून, यामध्ये दमदार बॅटरीही देण्यात आली आहे.
Samsung च्या Galaxy Buds 3 Pro मध्ये 53mAh बॅटरी असून, या माध्यमातून चार्जिंग केसमध्ये 515mAh बॅटरी आहे. त्याच्या बॅकअपबाबत 7 तासांचा दावा कंपनीकडून करण्यात आला. तर Galaxy Buds 3 मध्ये 48mAh बॅटरी देण्यात आली आणि चार्जिंग केस 515mAh बॅटरीसह येतो. बॅकअपसाठी 5 तासांचा दावा कंपनीकडून करण्यात आला. तर चार्जिंग केससह 30 तासांच्या बॅकअपचा दावा आहे. याशिवाय याला वॉटर रेझिस्टंटसाठी IP57 रेटिंग मिळाली आहे.
Galaxy Buds 3 मध्ये 11mm डायनॅमिक ड्रायव्हर असेल, तर Galaxy Buds 3 Pro मध्ये 10.5mm डायनॅमिक ड्रायव्हर असेल. या दोन्ही इअरबड्सच्या प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत आणि 24 जुलैपासून विक्री सुरू होईल. भारतात Galaxy Buds 3 ची किंमत 14,999 रुपये तर आहे आणि Galaxy Buds 3 Pro ची किंमत 19,999 रुपये असणार आहे.