पुणे प्राईम न्यूज : अनेक महिलांना दररोज मेकअप करायला खूप आवडतं. जर तुम्ही पहिल्यांदाच मेकअप करत असाल तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी सहजपणे मेकअप करू शकता. पहिल्यांदा मेकअप करताना या गोष्टींची काळजी घेतली तर काही अडचण येणार नाही.
– प्रथम मेकअप करण्यापूर्वी चेहरा हलक्या फेस वॉश किंवा कोमट पाण्याने धुवा.
– मेकअप करण्यापूर्वी मेकअप साठी लागण्याऱ्या वस्तू या चांगल्या कंपनीच्या असाव्यात.
– सुरवातीला त्वचेवर 10 मिनिटे बर्फ चोळा. म्हणजे मेकअप बराच काळ टिकतो.
– मेकअप करण्यापूर्वी सर्वात आधी तेल फ्री मॉश्चरायझर लावावे. त्यानंतर फाउंडेशनचे ठिपके कपाळ, नाक, हनुवटी आणि गालावर लावावे. बोटांनी हळू हळू फाउंडेशन सर्व ठिकाणी नीट पसरवावे.
– फाऊंडेशन ओल्या स्पंजने सुद्धा लावू शकता. फाउंडेशन लावल्यानंतर त्वचेवरचे डाग लपतात. त्यानंतर छोट्या ब्रशने किंवा स्पंजने या भागात विशेषत: नाकाच्या भोवती कन्सीलर लावा. बोटांनी हलके लावावे म्हणजे कंसीलर व्यवस्थित लागू शकते.
– डोळ्याच्या मेकअपला हायलाइट करायचा असेल तर ओठांचा मेकअप हलका ठेवा म्हणजे गुलाबी, पीच यासारख्या हलक्या रंगाची लिपस्टिक लावावी.
– लिपस्टिक लावण्यासाठी लिप ब्रश वापरा. यासह, लिपस्टिक सर्व ओठांवर एकसारखी लावा त्यामुळे ती बराच वेळ टिकेल.
– शेवटी कॉम्पॅक्टसह पुन्हा एकदा मेकअपला टचअप करा.