नाशिक: सध्या राज्यात हिट अँड रन प्रकरणाची संख्या वाढत आहे. नाशिक शहरात पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. सिटी लिंक बसने शाळकरी मुलीला चिरडले आहे. ही घटना नाशिकरोड परिसरातील घडली. यानंतर बस चालक फरार झाला आहे. बस चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप जमावाने केला आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसांमधील ही चौथी घटना आहे. एक दिवस अगोदर म्हणजेच मंगळवारी एका कारचालकाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला होता.