पुणे : भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) राज्यातील सात अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून मंगळवारी (ता.09) काढण्यात आले आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण (CID) विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियक्ती करण्यात आली आहे.
भारती पोलीस सेवेतील (आयपीएस) राज्यातील सात अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून मंगळवारी (ता.09) काढण्यात आले.
राज्यातील बदली झालेल्या अधिका-यांची नावे (सध्याचे आणि कंसामध्ये नवीन नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्रमाणे…..)
– डी. टी. शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त- पूर्व, ठाणे शहर (अतिरिक्त आयुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार).
– शहाजी उमाप, अतिरिक्त आयुक्त- विशेष शाखा, मुंबई (पोलिस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र).
– संजय जाधव, अतिरिक्त आयुक्त प्रशासन ठाणे शहर (अतिरिक्त पोलिस आयुक्त-पूर्व, ठाणे शहर).
– अभिषेक त्रिमुखे, पोलिस उपमहानिरिक्षक- राज्य राखीव पोलिस बल मुंबई (अतिरिक्त पोलिस आयुक्त मुंबई).
– शिवाजी राठोड, अतिरिक्त आयुक्त- दक्षिण विभाग नागपूर शहर (अतिरिक्त आयुक्त- विशेष शाखा, मुंबई).
– श्रीकांत पाठक, अतिरिक्त आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार (अतिरिक्त आयुक्त-प्रशासन ठाणे शहर).