मुंबई : मुंबई, उपनगरे आणि ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील आज मंगळवारी (9 जुलै) सकाळी आणि दुपारच्या दोन्ही सत्रातील होणा-या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर होतील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
Maharashtra | Due to heavy rain forecast in Mumbai, Mumbai Suburbs, Thane, Raigad, Palghar, Ratnagiri, and Sindhudurg districts, all exams scheduled for today (July 9, 2024) at the University of Mumbai have been postponed. New dates will be announced soon: University of Mumbai
— ANI (@ANI) July 9, 2024
पावसामुळे मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सीडीओई म्हणजेच आयडॉलच्या 11 ते 2 या वेळेत परीक्षा होणार होत्या. मात्र, मुंबईला पावसाचा अलर्ट देण्यात आल्याने या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या परीक्षा 13 जुलै रोजी 11 ते 2 या वेळेत नियोनीत परीक्षा केंद्रावर होणार आहे.
सर्व यंत्रणा सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.