पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण आता मुंबईतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’, मुंबई येथे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शैक्षणिक सहकारी हे पद आता भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 11 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यात निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 35,000 ते 45,000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 32 वर्षाखालील व्यक्ती अर्ज करू शकणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://iimmumbai.ac.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 ही असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असे सांगण्यात आले आहे.