पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण अनेकदा संधी हुकतेच. पण आता पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
पुणे महानगरपालिकेत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. प्रशिक्षक या पदावर ही भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रशिक्षक.
– एकूण रिक्त पदे : 12 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वयोमर्यादा : 18-58 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 8 जुलै 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जुलै 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : एस.एम. जोशी हॉल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या बाजूला, पुणे-11.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pmc.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.