दिनेश सोनवणे
दौंड : गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्याला दौंड पोलीसांनी पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली येथून ताब्यात घेतले.
या वाहतुक प्रकरणी पोलिसांनी नासीर शेख (वय 38 वर्षे रा. 130 सिध्देश्वर पेठ, शहापुर चाळ, सोलापुर) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी चिंचोली येथे फिक्कट पिवळ्या रंगाच्या अशोक लेलँड या माल टेम्पोमध्ये गोमांसाची वहातुक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सूत्रे हलवत आरोपीला गाडीसह (MH 03 OV 8549) आरोपीला ताब्यात घेतले.
यावेळी गाडीमध्ये सुमारे ९०० किलो गाईचे व बैलाचे मांस ताब्यात घेण्यात आले. हे मांस निळ्या रंगाच्या कँडमध्ये भरून ठेवण्यात आले होते. असे तब्बल ९ कँड या गाडीत सापडले असून प्रत्येक कँडची क्षमता सुमारे १०० किलोची आहे.
आरोपीवर भारतीय दंड सहिता कलम ४२९, ३४ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.