इंदापूर : राज्यात सद्या राजकारणाचे वारे जोरदार वाहताना दिसत आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय खडाजंगी होताना दिसत असून त्यात बॅनरबाजी आघाडीवर आहे. अशीच ही बॅनरबाजी इंदापूरमध्येही दिसून आली आहे. राजकीय पक्षांकडून आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ केले जात असलेल्या बॅनरबाजी विरुद्ध इंदापूर येथील कवी माऊली नाचण यांननी एक विडंबनात्मक कविता सद्या चर्चेचा विषय ठरत आहे. कवी माऊली नाचण यांची ‘पोस्टर वॉर’ ही कविता आताच्या राजकीय बॅनरबाजीवर भाष्य करणारी विडंबनात्मक कविता आहे.
पोस्टर वॉर
आमदारकीसाठी
इंदापूरात रंगले आहे
पोस्टर वॉर
उतावीळ झालेले
कार्यकर्तेच आहेत
या गोष्टीला फॉर
भाजपच्या कार्यकर्त्यांचा
हर्ष मावळल्याने त्यांनी
हाती घेतले आहे विमान
आमचे फिक्स असते
म्हणत घड्याळाच्या
काट्यावर भरणेंचीच
दिसते आहे कमान
साहेब सांगतील
तोच आमदार
म्हणत तुतारीने फुंकले
आहे रणशिंग
रिपब्लिकन पार्टीनेही
उमेदवारीसाठी
बांधले आहे बाशिंग
लक्ष्य नाही फिक्स
म्हणत पुढे सरसावला
आहे गाव दादांचा गट
या सगळ्यात भर
म्हणून पुढे आली
आहे महिला उमेदवार
मागणीची अट
आगामी काळात
उमेदवारांची प्रचंड
वाढणार आहे लिस्ट
यंदाची इंदापूर
विधानसभा निवडणूक
होणार आहे क्लिष्ट
माऊली नाचण
इंदापूर,जि.पुणे
8668708351