India vs Zimbabwe, T20I : भारतीय क्रिकेट संघ हा झिम्बाब्वे दौ-यावर आहे. हरारे येथे रविवारी (7 जुलै) टी20 मालिकेचा दुसरा सामना होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे समोर 235 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यादरम्यान भारतीय संघाने 20 षटकात 2 बाद 234 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरलेली आहे. यापूर्वी झालेल्या 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेविरुद्ध 2 बाद 229 धावा केल्या होत्या. तर दुस-या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूने लागला आहे.
भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे झिम्बाब्वे संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागणार आहे. या दोघांनीही शतकी भागीदारी केली आहे. आक्रमक खेळणा-या अभिषेक शर्माने 14 व्या षटकातच षटकार मारत शतक पूर्ण केले आहे. मात्र, त्याच्या पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने 47 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकार मारताना 1000 धावांची खेळी केली आहे.
अभिषेक शर्मा हा बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडला साथ देण्यासाठी रिंकु सिंग आला. या दोघांनीही फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. यावेळी ऋतुराजनेही अर्धशतक पूर्ण केले. तसेच रिंकुने अखेरीस जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे भारताने विक्रमी धावसंख्या उभारली. अखेरीस ऋतुराज गायकवाडने 47 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारासह 77 धावा करुन नाबाद राहिला. तसेच रिंकुने 22 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 5 षटकार मारले. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनी आणि वेलिंग्टन मसकद् झा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.