नवी दिल्ली : सध्या नवनवीन गॅजेट्स लाँच केले जात आहेत. विविध कंपन्यांकडून त्यात विशेष फिचर्सही देण्यात येत आहे. त्यात आता प्रसिद्ध टेक्नॉलॉजी कंपनी Lenovo ने आपला नवीन Lenovo Tab + टॅबलेट लाँच केला आहे. यात डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह 8 JBL स्पीकर आहेत.
Lenovo च्या या Tab मध्ये 8 JBL स्पीकर असून, ज्यामुळे ते ब्लूटूथ स्पीकर म्हणून देखील वापरले जाऊ शकते. ज्याद्वारे युजर्स टॅब्लेटद्वारे गाणी किंवा पॉडकास्टही करू शकतात. यामध्ये 11.5 इंच 2K 2,000 x 1,200 पिक्सेल LCD स्क्रीन असून, ज्याचा रिफ्रेश रेट 90 Hz आणि 400 nits च्या ब्राइटनेस लेव्हलसह येतो. मागील बाजूस ऑटोफोकससह 8 MP कॅमेरा असून, याच्या मागील बाजूस स्टँडबाय फोकससह 8 MP सेन्सर आहे.
यासह, युजर्संना टॅब्लेटद्वारे स्मार्टफोनसारख्या इतर ब्लूटूथ डिव्हाईसेसवरून गाणी ऐकता येऊ शकणार आहेत. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यात दमदार अशी 8600 mAh ची बॅटरी देण्यात आली असून, जी 45 W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात MediaTek Helio G99 प्रोसेसर असून, 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.