सासवड : तालुका विधी सेवा प्राधिकरण, सासवड बार असोसिएशन यांचे संयुक्त विदयमानाने मा. मुख्य मध्यस्थी केंद्र, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशाप्रमाणे, मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.म.ताहेर बिलाल, प्रमुख न्यायाधीश अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, श्रीमती. एस. के. देशमुख, श्री. महेश भरड, सह दिवाणी न्यायाधीश उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांनी गुलाबाचे रोप देवून केले.कार्यकमाचे प्रास्ताविक ॲड. प्रकाश खाडे यांनी केले.
लैगिंक गुन्हयापासून मुलांचे संरक्षण या विषयांवर ॲड. विजय भालेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.बालकांचे हित साधण्याचे काम कायदयाने केले आहे, सुसंस्कृत समाज घडविण्याची जबाबदारी समाजाची असल्याचे त्यांनी विशद केले. समाजानेच मुलांना सुसंस्कृत घडवावे असे आवाहन केले. मध्यस्थी एक दुवा या विषयांवर ॲड. महेश बारटक्के यांनी मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त तंटे हे मध्यस्थीदवारे आपआपसात मिटवावेत, मध्यस्थी हा दोन घटकामधील एक महत्वाचा दुवा असल्याचे त्यांनी विशद केले.
यावेळी प्रमुख न्यायाधीश श्री. ताहेर बिलाल साहेब यांनी मनोगत व्यक्त केले. कायदा हा प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचा असून त्याचा सदुपयोग व्हावा हे त्यांनी विशद केले. विदयार्थ्यांनी पुस्तकातील अनुक्रमणिका वाचून उपयोग नसून संपूर्ण पुस्तक वाचावे. विदयार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग कुंटूब, देशहित, समाजहित व समाजातील गरीब मुलांच्या हितासाठी उपयोग करावा असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती. एस. के. देशमुख यांनी कायदयाचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य असून आपला अधिकार बजावताना दुस-याच्या अधिकाराची पायमल्ली करु नये. मुलांनी आपल्या कुंटूबासोबत आई -वडीलांकडे आपले मन मोकळे करावे, चूकीची गोष्ट माहिती असेल तर ती चूकीची गोष्ट विदयार्थ्यांनी करु नये असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण, उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार, महाविदयालयाच्या कायदेशीर सल्लागार ॲड .कला फडतरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब पिलाणे, राहूल कोलते, मधुकर झिंजुरके, दशरथ घोरपडे, सतीश राणे, उमेश आगवणे, दत्तात्रय फडतरे, व्यंकटेश बोरकर, रामदास भोसले, आदी सभासद उपस्थित होते. कार्यकमाचे सुत्रसंचालन प्रा. श्वेता फडतरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन कॉलेजचे संजय रोकडे तसेच विधी सेवा समितीचे वरीष्ठ लिपीक परशुराम देशमुख यांनी केले. ॲड.गणेश उरणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.