नवी दिल्ली: NEET UG पेपर लीक प्रकरणी केंद्र सरकारने आज (दि. ५) सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. NEET परीक्षा रद्द करणे योग्य नाही, जर परीक्षा रद्द केली, तर हा होतकरू विद्यार्थ्यांचा विश्वासघात ठरेल. तसेच मोठ्या प्रमाणात परीक्षेत अनियमितता झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असं देखील केंद्र सरकारने म्हटलं आहे. NEET प्रकरणी आठ जुलै रोजी रेग्युलर बेंच समोर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.