मुंबई : महायुती सरकारने अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजना घोषित केली खरी परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवक लाडकी बहिण योजनेसाठी 100 रुपयांत महिलांना बँक खाते उघडून देण्याची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडून सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या महिलांच्या नावावर बँक खाते नाही त्या महिला याचा लाभ घेऊ शकणार आहेत.
माझी लाडकी बहिण योजनेसाठी फक्त शंभर रुपयांत महिलांना बॅंक खातें उघडून देण्याची सुविधा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने उपलब्ध करून द्यायचे ठरवलंय. शंभर रुपये भरून पुणे जिल्ह्यातील बँकेच्या कुठल्याही शाखेत महिलांना खाते उघडता येणार आहे. ज्या महिलांच्या नावावर बँक खाते नाही त्या महिला याचा लाभ घेऊ शकतील. बँकेच्या 294 शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुरगाडे यांनी याची घोषणा केली आहे.
राज्य सरकारच्या घोषित योजनेचा लाभ मिळण्यासाठीची नवीन खाते उघडण्याची सुविधा बँकेत उपलब्ध करून देण्यात येत आहे. महिला भगिनींच्या जिल्हा बँकेतील कोणत्याही शाखेत सध्या चालू असलेल्या बचत ठेव खात्यामध्ये देखील सरकारच्या योजनेतील रक्कम जमा करूनही लाभ घेता येईल. या खातेदारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि जीवन सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळेल. जिल्हा बँकेच्या 294 शाखा कार्यरत असून कार्यालयीन वेळेत महिला भगिणींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी शंभर रूपयांत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देणारी राज्यातील पहिली बँक ठरली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना जमा होणार 1500 रूपये जमा होणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड
- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- मतदान ओळखपत्र / जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला(वार्षिक उत्पन्न रू. २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य)
- पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट
- सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्ड